शाळेत असताना,
जवळपास झाली असतील ४० एक वर्षे, म्हाताऱ्या आई (आजीला, आम्ही म्हातारी आई म्हणायचो) बरोबर कधीतरी, या मिरजकर तिकटी चौकातील, जुन्या दत्ताजीराव शेळके शाळेला आल्याचे बारीकसे आठवते. माझी आजी शिक्षिका होती. काही कामानिमित्त येथे आम्ही, तपोवन मधील घरापासून चालत आलेलो..
तसे पायी येणे बऱ्याचदा व्हायचे, अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी. प्रत्येक वेळी, येथील, बाजूलाच असलेले शेषशायी विष्णू मंदिराला आवर्जून भेट. त्यावेळी मला नेहमी प्रश्न पडायचा, याला मंदिर कसे म्हणायचे, कारण, याला तर साध्या भिंती आणि वर उतरते कौलारू छप्पर, आजूनदेखील ते तसेच आहे. यालाच लागून असलेला, शाहू महाराजांच्या काळातील, जमिनीवरील पाण्याची टाकी आणि त्याला असलेल्या जुन्या चाव्या, ती देखील अजून तशीच आहे..
आणि हो तो काळा दगडी मिनार, चौकाच्या बरोबर मधी असलेला. त्यावरील कोरलेली पणती, सूर्य आणि साल, त्याकडे पाहताच क्षणी नजरेत यायचे. याच्या भोवताली असलेल्या दगडी पाकळ्या, त्या मात्र रंगवलेल्या, अगदी पूर्वीसारख्या.. बदल काय तो फक्त ग्रील मध्येच.. गणपती वेळी, त्याकाळी येथे दरवार्षि एकच सिन- लाईट च्या माळांनी सजवलेली, ड्राइवर विना, गोल फिरणारी रिक्षा. नेहमी त्याचे अप्रूप वाटायचे....
आजच्या रेखाटनानिमित्त, या सगळ्या आठवणी मनामध्ये ताज्या झाल्या.. I think, sketching is a very good media to connect with the place and the time...
धन्यवाद रेखाटन..

मिलिंद '२५'०८'२०१९

No comments:
Post a Comment