Tuesday, March 24, 2020

प्राथमिक शाळेत असताना (३५/४० एक वर्षपूर्वी).. त्यावेळची चंगळ म्हणजे महाद्वार रस्त्यावर रविवारच्या संध्याकाळी कधीतरी (वर्षातून एक दोनदा) निमित्त मात्र केलेला फेरफटका, सगळ्यांसोबत- आई पप्पा, आजी, माझे दोन्ही भाऊ.. बहुतेकदा सहजच.. आणि कधीतरी वाढदिवस निमित्त एखादा कपडा खरेदी...
कार्यक्रम ठरलेला, बसने तपोवन पासून मिरजकर तिकटी पर्यंत येणे, तेथे शेषशायी विष्णूचे दर्शन घेणे.. चालत बिनखांबी गणेश मंदिर पर्यंत येणे, त्याचे दर्शन घेणे...
हे ठिकाण म्हणजे महाद्वार रस्त्याचा सुरुवात बिंदू.. जो अजून देखील त्याच लकबीने दिमाखात मिरवत आहे.. याला बिनखांबी असे का म्हणतात हे बरेच वर्ष न उमगलेले कोडं...
येथून आमची ही चंगळ चालू व्हायची आणि परत फिरून, दासरामच्या दारात अंथरलेल्या बऱ्याच वेगवेगळ्या मराठी, हिंदी english मासिकांवर नजर फिरवून (आजही येथे तसाच scene आहे), शेजारील असलेल्या कामत मध्ये आंबोळी खावून परत उलटा प्रवास...
या आठवणी उलगडल्या, आजच्या बिनखांबी मंदिराच्या 'रेखाटन' मुळे... मस्त ते दिवस 

No comments:

Post a Comment