Tuesday, March 24, 2020

गट क्र. ८ : भिंत क्र. २० : राघूवाडा "परिवर्तन"
निमित्त होते, आमची Architecture college (CAK) ची X- students Association: e-seeed चे दरवर्षीप्रमाणे भरणारे स्नेह संमेलन. यावर्षीचा उपक्रम खुपच वेगळा, एका सामाजिक बांधीलकीतून निर्माण झालेला... "परिवर्तन" नाव त्याचे..
राघूवाडा ही एक शाहूवाडी तालुक्यातील जवळपास ३०० लोकांची वाडी. गावात मूलभूत सुविधांचा वणवा, त्यामुळे प्रचंड अस्वच्छता, त्रास, शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य अभाव. यावेळी eseeed convention हे वेगळेच करायचे हे आयोजकांचे ठरलेले, पूरग्रस्तांसाठी हाताळलेली मदतीचा अनुभव पाठीशी होताच.. आणि त्यांच्या पाहण्यात हे गाव आले... जवळ असलेले बजेट, human resources पाहता या वाडीची निवड त्यांनी केली आणि या गावचे नशीबच बदलून टाकले.. जवळपास ३ महिने कार्यकर्ते यासाठी आपला वेळ काढून राबत होते.. पुढे या उपक्रमाचाच भाग म्हणुन २ दिवसांचे स्नेहसंमेलन येथे ठेवले.. जवळपास १२५ CAK चे आर्किटेकट्स येथे आले, आणि त्यांच्याकडून गावातील जवळपास २५ एक भिंती वेगवेगळे ग्रुप करून, त्यांच्याच कल्पनेप्रमाणे रंगवून घेतल्या.. आणि पाहता पाहता ही ओसाड वाडी अतिशय सुंदर दिसू लागली... या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून २ वेळचे राष्ट्रपती पदक विजेते, तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले, पाटोळा गावचे सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील यांना आमंत्रित केले. त्यांच्या मार्मिक भाषणाने एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले.. या सर्व उपक्रमात तसेच स्नेह सम्मेलनात गावकर्यांना देखील सहभागी करून घेतले.. या योजने अंतर्गत अजून बरीच कामे पुढे होतील, पाण्याचा प्रश्न सुटेल..
असा हा अतिशय वेगळा उपक्रम, कार्यक्रम eseeed चे trustees सुरत जाधव, अंजली/ नरेश अग्रवाल, श्रीकांत/ सारंग जोशी, संतोष रामाने/ अभिनंदन, रणजित निकम/ अमित ओसवाल, गिरीश पाठक तसेच सर्व मित्र, सहकारी यांच्या प्रयत्नातून आकार घेतला, एक आदर्श निर्माण केला.. आम्हालाही यामध्ये त्यांनी सामील केले, याबद्दल खरंच खूप आनंद _/\_
आपण एकदा तरी येथे भेट द्याच..

No comments:

Post a Comment