कोजागिरी इन खिवा, उझबेकिस्तान..
या शीतल चंद्र प्रकाशात येथील उत्कृष्ट अशा रचना, खंडहर न्हाऊन निघालेले.. त्या शांत रात्री, वाळवंटातील थंड वाऱ्याच्या झुळकेबरोबर, एक अनामिक, निःशब्द संवाद त्या आकारांबरोबर, आकार घेत होता. चंद्र प्रकाशामुळे झालेल्या शेडस्, प्रकाश छटा, उजळलेले त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रंग, त्या वातावरणात एक चैतन्य निर्माण करीत होता.. आणि मी शांतपणे त्यांच्यातच समरस होऊन, एक वेगळीच अनुभुती घेत होतो...
मिलिंद '१३'१०'१९'

No comments:
Post a Comment