Saturday, June 12, 2021

 Turn off for: Marathi

'खोण',
घाटावरील ग्रामीण भागात, पावसाळ्यात, वाहत्या पाण्यातील मासे पकडण्यासाठीची पारंपरिक सहज सोपी पद्धत..
मला आवडलं याची एकमेकांत गुंतणारी रचना, form, structure, proportions, easy to install, आणि ज्याकरिता बनविले, ते सहज, विना कष्ट साध्य करण्याची किमया..



Monday, June 7, 2021

Samarkand

 'samarkand'


आपण भटकंती, भ्रमंती करताना, नकळत पणे बऱ्याच गोष्टींची, जाणिवांची, अनुभूतींची एक लायब्ररी, आपल्या मेंदूच्या एका कप्यात तयार होत असते.

कधीतरी, बहुतेकदा, भूतकाळाच्या एखाद्या गाठोड्यामधून, सारातून, मिश्रणातून एखादी कल्पना, रचना, कृती, कला द्वारे अनाहूतपणे बाहेर येण्याचा, किंवा प्रभावित करण्याचा अजाणतेपणे, उस्फुर्तपणे एक प्रयत्न होत असतो. त्यांचे एक कोलाज सदृश्य पुसट दृष्य - अदृष्य आकारांची संवेदना होत असते. याचा अनुभव बऱ्याचदा मला येतो..

असेच एक पेंटिंग साकारताना, अचानकपणे काही वर्षांपूर्वी भटकलेल्या, उझबेकिस्तान मधील 'समरकंद' मधील जाणीव- प्रतिमांचा प्रवेश झाला.. तेथील रचनांचे भव्य आकार, आकर्षक निळे, मोरपंखी, पिवडी, वाळवानटी रंग, आकाश, प्रकाश त्यांचा एकमेकांशी असलेला मिलाफ... यांच्यामध्ये गुंतून गेलो... त्यांनी पेंटिंग चा ताबा घेतला, त्यांना एक रूप देण्याचा प्रयत्न झाला .


(could not click better image, because of phone limitations)



Thursday, August 27, 2020

अणदूर

मी,

माझ्यासमोर,
पावसात भिजनारा तलाव अणदूर...
थोडे दूर,
पलीकडे, किनाऱ्यावरील ती न्हाहलेली टेकडी...
अजून दूर,
त्या हिरव्यागार टेकडीपल्याड,
ती निळी टेकडी...
घरंगळणाऱ्या, पानेरी जलरंगात निथळलेली,
दूर दूर, अजून दूर,
तिचेच पानेरी जलरंग, वर करड्या आकाशात उफाळून येणारे...
त्याहीपलीकडे, अजून दूर,
तो आकाशी करडा रंग, दूर दूर शुभ्रात लोप पावलेला...
हे,
हे हे सर्व,
झर्र्कन..
छपरावरील, त्या गवत काडीवरून घरंगळणाऱ्या,
इवल्याशा थेंबात एकवटले...
टपकन, खाली पडले...
जमिनीमध्ये विरून गेले, नाहीसे झाले...
माझ्यासमोर,
माझ्यासह.

22.08.20

Wednesday, April 29, 2020

C O  O   L  ......
random brush strokes with acrylic on discarded wooden floor sample..


काही वर्षांपूर्वी, हिमालयाच्या अंतरंगात भटकताना (तशी ही मित्रांसोबत रस्त्याने केलेली मनाली- लेह- द्रास- कारगिल- श्रीनगर ट्रिप) थोडे off route म्हणून बारलाछा ला पास आणि लाचुलनग ला पास मधील अवाढव्य पसरलेल्या सारचु तलाव ला जायचे होते..
प्रवासा दरम्यान जिस्पा व्हॅली मध्ये मुक्काम होता.. ठिकाण सुंदर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून फेरफटका मारताना बाजूला एक सुंदर छोटी नदी होती.. सकाळची सुंदर सूर्य किरणांनी आजूबाजूची हिमाच्छादित शिखरे चमकत होती... अत्यंत सुंदर, उल्हासित वातावरण..
नदी असल्यामुळे आजूबाजूला, वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे बरेच गोल मटोल, गोटे पसरलेले होते... मनामध्ये आले, याचा उपयोग करून जर काही या निसर्गाच्या सौन्दर्यात शिल्पे, रचना निर्माण केल्या तर.... आणि या अवाढव्य हिमालयाला समर्पित केल्या तर, त्याची प्रति एक प्रकारचा आदर, कृतज्ञता व्यक्त केला तर..

आणि लगेचच काम चालू केले... आजूबाजूचे, जसे समर्पक ठरतील तसे, साधारण संकल्पना मनात ठेवून काम चालू केले.... व बऱ्याच काही रचनांनी आकार घेतला.. यांच्या सानिध्यात मी थोडा वेळच असणार आहे, याची कल्पना होतीच.. यांचे पुढे काय होईल.. काय माहित,

त्या अजून देखील तेथे असतील का, का लय पावल्या असतील, विस्कटल्या असतील, नाहीश्याच झाल्या असतील... त्या ग्रेट हिमालायलाच माहीत
Acrylic on Canvas.
Size- 3'-0" × 3'-0" (900mm × 900mm).
Tools- brushes n knife.

My first large canvas painting effort... The canvas i brought almost 6 months back but could not dare to put the colours.... some kind of fear or inability to deal with such large size..
Somehow, finally I could overcome this challenge in this corona vacation with available resources and took around 30 hours, in 6 days.

I decided to give a try to capture the glory of fabulous Jain temple complex at Palitana (Bhavnagar District in Gujrat) on Shatrunjaya Mountains. This was my solo trip almost 12 years back.
Palitana is the world's only mountain (elevation- 7300 ft., 2250mt.) that has more than 900 temples The Palitana temples and whole mountain are considered the most sacred pilgrimage place (tirtha) by the Jain community, and is the world's largest Temple Complex. A must visit place for explorers..
(Info.- Google)