'गुऱ्हाळ',
(गूळ तयार करण्याचा उद्योग) कोल्हापूरची एक वैशिष्ट्य पूर्ण ओळख... अशा या थंडीच्या ऋतूत, ही गुऱ्हाळे पेटतात, तेंव्हा, त्यांच्या धगीने, आसपासचा परिसरात, हव्याहव्याश्या वाटणाऱ्या उबदारीची एक लय पसरते... त्याची जडणघडण, कामगारांची लगबग, चिपाडे पेटवून उस- रसाच्या काहिलीला दिलेली धग, त्यामुळे उकळत्या रसातून निघालेली वाफ, व खालील उसाच्या चिपाड्यांचा धूर... पहाटेच्या धुक्यातील त्या जलबिंदूनमधून, त्या धुराचा व वाफेचा झालेला प्रवास आणि त्यामुळे निर्माण झालेला, एक प्रकारचा मंद, कुंद, पण, हवासा वाटणारा गंध.... एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो.. धुक्यात, धुरात व त्या लगबगीत, आजूबाजूच्या पक्षी किलबिलाटाबरोबर, साहजिकच आपण ही सामावून जातो.
आसपासच्या ग्रामीण भागात असा एक दुर्मिळ, हा वेगळा ऋतू उमंगतो... सर्वत्र उल्हास पसरवितो....
आसपासच्या ग्रामीण भागात असा एक दुर्मिळ, हा वेगळा ऋतू उमंगतो... सर्वत्र उल्हास पसरवितो....
रेखाटन '२९'१२'१९' मिलिंद
स्थळ: आर्कि. विजय कोराने गुऱ्हाळ, फुलेवाडी.
स्थळ: आर्कि. विजय कोराने गुऱ्हाळ, फुलेवाडी.


No comments:
Post a Comment